Monday, 14 March 2016

कवितेची प्राजक्तफुले

MY DAD ...

चिमुकल्या किलकिल्या डोळ्यानी 
जेव्हा मी बाहेरच जग पाहिल....
आई च्या शेजारी उभ्या बाबांच्या
डोळ्यात अपार कौतुक साठल.  !


कलेकलेने वाढताना 
तुमची अनेक रुपे अनुभवली ,
आमच्यावरली तुमची  माया-ममता,
डोळ्यात भरभरूनी साठवली !


तुमच्या करारी व्यक्तिमत्वाचा 
जरी आम्हास वाटे धाक,
परि दुखले खुपले आम्हास काही,
दिसे तुमच्या डोळ्यात वेदनेची झाक !


'आई'च्या प्रेमात मधाची गोडी,
सर्वाहुनी परे अन्
तुमच्या मायेची रितच न्यारी,
जसे फ़णसामधले गोड गरे !


अमुचे सर्वेसर्वा तुम्हीच,
अमुचा आयुष्यपट तुम्हीच रंगविला ,
जिवनाचा श्रीगणेशा आम्ही ,
तुमचाच हात धरुनी गिरवला !


किती कष्टता बाबा तुम्ही,
आम्हास सुखी ठेवण्यास,
अमुच्या हितासाठी अखंड झटणे
हेच ठाऊक तुम्हास !


नाही पुरविलेत कधी स्वत:चे कोडकौतुक 
सदैव अमुचाच विचार केला ,
अमुच्या रोपांची निगराणी करताना,
आम्हा सर्वांचा आधारवड बनला !


तुमच्यामुळेच अमुच्या  जीवनात होतेय,
वजाबाकी "मी" पंणाची !
तुमचे बोट धरून चालत रहाणे,
हिच धारणा तुमच्या लेकरांची !


I LOVE YOU MY DAD

No comments:

Post a Comment